• नंदुरबार - मान्सूनपूर्व वाऱ्याचा फळ-पिकांना फटका, शेतकऱ्याचे नुकसान
  • पुणे - प्रत्येक कुटुंबाला गॅसजोडणी आवश्यक - खासदार अनिल शिरोळे
  • पुणे-चुकीच्या पद्धतीने निधी खर्च केल्यास आंदोलन, अपंग हक्क सुरक्षा समितीचा इशारा
Redstrib
हिंगोली
Blackline
हिंगोली - पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी शेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात पत्रकारांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या घटनेचा पत्रकारांनी निषेध नोंदवला आहे. सोमवारी हिंगोली, औंढा-नागनाथ, सेनगाव, कळमनुरी पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
Published 29-May-2017 20:55 IST | Updated 22:51 IST
हिंगोली - खऱ्या १० लाख रुपयांच्या नोटांच्या मोबदल्यात ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देतो, असे म्हणून बनावट नोटांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचे समोर आले आहे. औंढा नागनाथ येथे दाखल झालेल्या ३ आरोपींना पोलिसांनी छापा टाकून पकडले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Published 28-May-2017 21:42 IST
हिंगोली - घरगुती वादातून पतीनेच पत्नीला धारधार शस्त्राने भोसकले. यात त्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून परवीन बेगम शेख सलीम ( वय ४७ ) असे त्या महिलेचे नाव आहे. तर शेख सलीम शेख इस्माईल असे त्या खुनी पतीचे नाव आहे. ही घटना शहरातील नगर परिषद कॉलनी येथे घडली.
Published 28-May-2017 19:37 IST
हिंगोली - नांदेड-औरंगाबाद मार्गावरील आंबाचौंढी येथील ढाबा चालकावर ४ ते ५ अज्ञातांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी रात्री घडली असून ढाबा चालकाला नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published 28-May-2017 13:40 IST
हिंगोली - सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. यावेळी त्यांनी पत्रकारांवर चांगलेच तोंडसुख घेतले. पत्रकार ही जातच बांडगुळ असल्याचे सांगत त्यांच्या जीवावर आमचे राजकारण चालते का असा सवाल त्यांनी केला. दांडकेवाल्या आणि लिहिणाऱ्यांनाही मी घाबरत नाही, तर एखाद्याला जोड्याने मारेल असे ते बरळल्याने खळबळ उडाली.
Published 27-May-2017 22:18 IST | Updated 22:56 IST
हिंगोली - सेनगाव शहरातील तरुण शेतकरी ओमप्रकाश (बाळु) निवृत्ती हरण (२१) या युवकाचा स्वत:च्या शेतात हळद शिजविताना तोल जाऊन कढईत पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Published 27-May-2017 11:29 IST
हिंगोली - एका २२ वर्षीय तरुणीला वाम मार्गावर नेण्यासाठी बळजबरी करणाऱ्या महिलेला नांदेडच्या वसमत शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यासाठी दबाव टाकत होती. या कामासाठी तरुणीने नकार देताच महिलेने वसमत बस स्थानकातच तरुणीला मारहाण करायला सुरूवात केली.
Published 24-May-2017 13:00 IST
हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक क्रेन विहिरीत पडून खोदकाम करणाऱ्या शामराव जामदाडे या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
Published 21-May-2017 19:13 IST
हिंगोली - शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही. त्यांना पुरेशा प्रमाणात खत आणि बियाणे उपलब्ध होणार असून, येणाऱ्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनामार्फत त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Published 21-May-2017 14:43 IST
हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा येथे दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगेश बाळु घोंगडे ( वय १३ ) आणि महेश बाळु घोंगडे (१०), अशी या भावांची नावे आहेत.
Published 16-May-2017 23:14 IST
हिंगोली - जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शेतात भुईमूगाच्या पिकाला पाणी देताना ही घटना घडली.
Published 15-May-2017 16:13 IST
हिंगोली - उपविभागिय अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सातबारा देण्यासाठी लाच घेणाऱ्या तलाठ्याला एसीबीने रंगेहाथ पकडले. गजानन जगन्नाथ गुंजकर असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
Published 11-May-2017 11:14 IST
हिंगोली - अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीने पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढला. कळमनुरी शहरातील व्यंकटेशनगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
Published 10-May-2017 12:35 IST
हिंगोली - कोणत्याही आईचे आपल्या बाळावर किती प्रेम असते याचा दुर्देवी प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. आपल्या चिमुकलीवर घरातील कोणतीही व्यक्ती उपचारार्थ तत्परता दाखवत नसल्याचे पाहून एका आईने आत्महत्या केली आहे. वर्षा गजानन बुरपुटे (वय २७ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. ही हदयद्रावक घटना वसमत तालुक्यातील खाजमापुरवाडी येथे घडली आहे
Published 08-May-2017 20:11 IST

video play
'त्या' पत्रकारांना जोड्याने मारले पाहिजे; दिलीप का...
video playहळद शिजवताना कढईत पडून तरुणाचा मृत्यू
हळद शिजवताना कढईत पडून तरुणाचा मृत्यू

रोजा धरताना अशी घ्या आरोग्याची काळजी
video playझोपण्याअगोदर वाचन्याचे हे आहेत फायदे !
झोपण्याअगोदर वाचन्याचे हे आहेत फायदे !
video playतुमच्या पोटावर अतिरिक्त चरबी असेल तर सावधान  !
तुमच्या पोटावर अतिरिक्त चरबी असेल तर सावधान !