• नंदुरबार - मान्सूनपूर्व वाऱ्याचा फळ-पिकांना फटका, शेतकऱ्याचे नुकसान
  • पुणे - प्रत्येक कुटुंबाला गॅसजोडणी आवश्यक - खासदार अनिल शिरोळे
  • पुणे-चुकीच्या पद्धतीने निधी खर्च केल्यास आंदोलन, अपंग हक्क सुरक्षा समितीचा इशारा
Redstrib
बीड
Blackline
बीड - अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी शिवारातील वाण नदीपात्राच्या दोन्ही बाजूस सुरू असलेल्या गावठी दारूभट्ट्यांवर ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात दारू निर्मितीचे रसायन, तयार दारू, लोखंडी बॅरल, दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य, असा एकूण ७ लाख ५२ हजार ३४० रूपये किंमतीचा ऐवज नष्ट करण्यात आला.
Published 28-May-2017 08:56 IST
बीड - शहरातील विठाई नर्सिंग स्कूलमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या राणा डोईफोडे यांना शुक्रवारी भर रस्त्यात विद्यार्थिनींनी चोप दिला. आमच्याकडे बघून अश्लील चाळे करत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी राणा यांच्यावर ठेवला आहे. पोलिसांनी संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Published 27-May-2017 14:32 IST | Updated 15:36 IST
बीड - गेल्या चार दिवसापासून राज्यभरात महावितरण कंपनीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी चक्क अर्धनग्न आंदोलन करुन अनेकांचे लक्ष वेधले.
Published 26-May-2017 14:13 IST
बीड - वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील मधुकर दगडू चौधरी यांच्या घराच्या पडवीचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. तर टाकळसिंग येथे एका घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले.
Published 26-May-2017 10:38 IST
बीड - संपूर्ण मराठवाड्याला आपल्या दमदार गायकीने भुरळ पाडणारे गायक सुभाष शेप यांच्या गाडीचा आज अपघात झाला. अपघातादरम्यान कारमधील एअर बॅग उघडल्याने गाडीतील सुभाष शेप आणि त्यांच्या कुटुंबियांना गंभीर इजा झाली नाही.
Published 24-May-2017 22:05 IST
बीड - जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या अडीअडचणी पाहता, पत्रकारांच्या हितासाठी झगडणार्‍या मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील परिषदेशी संलग्‍न असलेल्या सभासदांसाठी जवळपास ४ कोटी ५० लाख रुपयाचा विमा काढण्यात आला आहे.
Published 24-May-2017 13:58 IST
बीड - आयपीएलच्या रविवारी पारपडलेल्या मुंबईविरुद्ध पुणे अंतिम सामन्यादरम्यान सट्टा खेळताना पोलिसांनी धाड टाकून २ लाख ८२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील मंडीबाजारात ही कारवाई करण्यात आली.
Published 24-May-2017 12:34 IST
बीड - देव आणि महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल तिडके यांच्यावर कडक कारवाई करा, या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला.
Published 23-May-2017 16:15 IST | Updated 16:42 IST
बीड - झेंडा, मोरया या सारख्या चित्रपटात संवेदनशील तरूणाची भुमिका करणारे प्रसिद्ध सिनेअभिनेते व निर्माता संतोष जुवेकरने बीड येथील मौजे जायभायवाडी ( ता. धारूर) या गावास जलसंधारणाच्या कामासाठी १ लाख रुपयांची मदत केली आहे.
Published 23-May-2017 13:50 IST | Updated 12:59 IST
बीड - मिरची विक्रेत्याचे २ लाख ५० हजार रुपये लंपास करत चोरांनी चांगलाच ठसका दिला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला घडली. आता पोलीसही या प्रकारच्या चोरीमुळे चक्रावून गेले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करुनच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली.
Published 23-May-2017 13:19 IST
बीड - आर्थिक अडचणही मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. याचा प्रत्यय देणारी घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली आहे. लक्ष्मीबाई एकनाथ हुलगे या महिलेचा आपल्या चौथ्या मुलीचे लग्न कसे करू, या धास्तीने ताप येवून मृत्यू झाला आहे.
Published 16-May-2017 12:00 IST | Updated 12:18 IST
बीड - एका उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील पोलीस उपनिरीक्षकासह त्याचे कुटूंबीय जखमी झाले. ही घटना अंबाजोगाई - कळंब रस्त्यावर सोमवारी दुपारी घडली.
Published 16-May-2017 09:01 IST
बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या यशश्री मुंडे यांचा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. यावेळी पदवीदान समारंभासाठी उपस्थित असलेल्या यशश्रीची आई प्रज्ञा मुंडे व मोठी बहीण तथा राज्याच्या ग्रामविकासमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांना गहिवरुन आले. तर यशश्री यांचा गौरव देशासाठी अभिमानास्पद मानला जात आहे.
Published 15-May-2017 17:22 IST
बीड - परळी बाजार समिती निवडणुकीत धनंजय मुंडेंनी बाजी मारली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीने १८ पैकी १४ जागा जिंकत भाजपचा दारुण पराभव केला आहे.
Published 15-May-2017 13:56 IST

video playसंतोष जुवेकरची जलसंधारणास एक लाखाची मदत
संतोष जुवेकरची जलसंधारणास एक लाखाची मदत

रोजा धरताना अशी घ्या आरोग्याची काळजी
video playझोपण्याअगोदर वाचन्याचे हे आहेत फायदे !
झोपण्याअगोदर वाचन्याचे हे आहेत फायदे !
video playतुमच्या पोटावर अतिरिक्त चरबी असेल तर सावधान  !
तुमच्या पोटावर अतिरिक्त चरबी असेल तर सावधान !