• पुणे- शार्दूल जाधव यांना 'अजित युवा पुरस्कार' जाहीर
  • पुणे- निगडी पोलिसांकडून पहाटे २ गुन्हेगारांना अटक, २ पिस्तूल जप्त
  • नागपूर- युग चांडक प्रकरण : अल्पवयीन आरोपी दोषी,आज निकाल
  • जम्मू-पठाणकोट रस्त्यावर अपघात, १ ठार तर २२ जण जखमी
Redstrib
औरंगाबाद
Blackline
औरंगाबाद - महानगर पालिकेच्या भूमिगत गटार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मनसेने महापालिकेत आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सर्वसाधारण सभेच्या सभागृहात जाण्याचाही प्रयत्न केला.
Published 20-Jul-2017 22:05 IST
औरंगाबाद - शहरात सुरक्षेच्या दृष्टीने नवीन दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या सीसीटीव्हीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाची सुरुवात आज करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन करण्यात आले.
Published 20-Jul-2017 21:21 IST
औरंगाबाद - राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत. कर्जमाफीवरुन शासन दररोज एक जीआर काढत आहे. त्यामुळे या कर्जमाफीबाबत शेतकऱ्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्या त्रुटी दूर करण्याची मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली.
Published 20-Jul-2017 21:33 IST | Updated 21:50 IST
औरंगाबाद - जे. शहा शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थ्याला गंभीर मारहाण केली आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पालकांच्या तक्रारीनुसार सिल्लोड पोलिसात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 19-Jul-2017 22:15 IST
औरंगाबाद - गेल्या २० दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतकरी वर्ग निराश झाला होता. गेल्या तीन दिवसांत पावसाची चिन्हे दिसू लागली होती परंतु पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र, मंगळवारपासून वातावरणात बदल घडत असून सांयकाळपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाला होती.
Published 19-Jul-2017 15:48 IST
औरंगाबाद - हनुमंतखेडा येथील १५ वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या चार आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
Published 19-Jul-2017 13:07 IST
औरंगाबाद - गटसचिवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सेवानिवृत्त होईपर्यंत वेतन देण्याचे आश्वासन दिले असताना आजही गटसचिवांना योग्य वेतन मिळत नाही. त्यामुळे गटसचिवानी आंदोलन केल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
Published 19-Jul-2017 11:09 IST
औरंगाबाद - शहरातून पैठणकडे जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीची विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात पोलीस कर्मचारी ठार झाला असून, त्यांची पत्नी व समोरील दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
Published 18-Jul-2017 22:43 IST
औरंगाबाद - विभक्त होण्याच्या कारणावरुन आई व मुलामध्ये वाद होऊन दोघांनीही विष पिल्याची हृदयद्रावक घटना पैठण तालुक्याच्या दाभरुळ येथे घडली. यात २९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर ५० वर्षीय आई मृत्यूशी झुंज देत आहे.
Published 17-Jul-2017 22:19 IST
औरंगाबाद - राज्य सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम मुदतीच्या आत व्हावे, यासाठी रस्त्याचे १६ पॅकेजेस केले आहेत. या रस्त्याचे काम ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी येथे दिली.
Published 17-Jul-2017 20:39 IST
औरंगाबाद - नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार सुरू आहे. शिवाय पाणलोट क्षेत्रामध्येही सातत्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे जायकवाडीत वरच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे मागील आठवड्यात १७ टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात सोमवारी २२.२५ टक्क्यांवर पाणीसाठा पोहचला आहे.
Published 17-Jul-2017 19:31 IST
औरंगाबाद - एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्यानंतर खून करुन नराधमाने तिचा मृतदेह दरीत फेकून दिला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी नराधमाला अटक करुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या १०-१२ तासांपासून मुलीचा मृतदेह भर चौकात ठेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
Published 16-Jul-2017 22:37 IST | Updated 22:41 IST
औरंगाबाद - पाणी आणायला विहिरीवर गेलेली दहावीत शिकणारी मुलगी गायब झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. या अल्पवयीन मुलीचे घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावरील डोंगराच्या दरीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
Published 16-Jul-2017 20:34 IST | Updated 14:57 IST
औरंगाबाद - राज्यभर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात शेतकऱ्याने पत्नीच्या उपचारांसाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published 15-Jul-2017 14:25 IST

video play१५ वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या चौघांना अटक
१५ वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या चौघांना अटक

सनी लिओनी