जिल्ह्यात आजही बहुतांश शेतकरी हे पारंपारीक पद्धतीने भात शेती करतात. येथील शेतकरी पूर्णतः या शेतीत गुरफटला गेलेला आहे. त्यामुळे आजच्या घडीला धानावर अवलंबून न राहता इतर शेतीची कास धरावी. याकरिता जिल्ह्यात प्रथमतः ३ दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन लाखनी तालुक्यात करण्यात आले आहे.
याठिकाणी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन आणि माहिती मिळणार आहे. त्याकरीता इत्तर जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी आले आहेत. शेतकऱ्यांकरीता वेगवेगळ्या वाणाच्या बियाणांचे स्टॅाल लावण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांनी श्री पद्धती धान लागवड, मत्स पालन, लाख शेती, मधमाशा पालन, अशा अनेक बाबी या प्रदर्शनामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
एकंदरीतच या ३ दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात सरपंच परिषद, शेतकरी मेळावा, शिवाय प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, असे अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार आहे.