उत्तरप्रदेशसह अनेक ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळाल्याने अनेकांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे.
याबाबत ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, विज्ञान-तंत्रज्ञानाच्यी युगात मतदानासाठी बॅलेट पेपरवर मतदानाची मागणीही मागे नेणारी आहे. बॅलेट पेपरमुळे मोठ्या प्रमाणात वेळ जातो. उलट ईव्हीएमवर मतदान करताना आणि मतमोजणीला वेळ लागत नाही.
मात्र ईव्हीएममध्ये बदल करुन टोटलायजर मशीनचा वापर करण्याची मागणी अण्णांनी केली आहे. टोटलायजर मशीनचा वापर केल्याने सर्व मतदान आकडेवारी एकत्रीत होईल. या ईव्हीएममध्ये मतमोजणी करताना कोणत्या भागातून कोणाला मत मिळते हे लक्षात येते. त्यामुळे मतदानाची गोपनीयता राखण्यास मदत होईल. या संदर्भात निवडणूक आयुक्तांना अनेकवेळा पत्र-व्यवहार केला. त्यांनीही सरकारला मशीन खरेदी करणाऱ्याठी पत्र-व्यवहार केला. मात्र सरकारने अजूनही पावले उचलली नाहीत.
तर अरविंद केजरीवालांच्या मागणीवर बोलताना अण्णांनी जगभरात ईव्हीएम मशीनवर मतदान होते. तर आम्ही त्यावर काय संशय घेणार ? असे सांगून नव्या तंत्रज्ञानाचे समर्थन केले. याचबरोबर ईव्हीएम मशीन ऐवजी टोटलायजर मशीनचा वापर झाल्यास कोणालाही शंका घ्यायला जागा मिळणार नाही, असे म्हटले. ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी टोटलायजर मशीनसाठी केलेला आग्रह राजकीय पक्ष पारदर्शकतेसाठी स्विकारणार का ? हा मात्र कळीचा प्रश्न आहे.