परियाणाचा क्रीडामंत्री अनिल विज
शनिवारी रोओ ऑलिम्पिक मेडलिस्ट साक्षी मलिकने ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर आश्वासनपूर्ती न केल्याचा आरोप केला. 'मी माझे ऑलिम्पिक मेडल आणण्याचे आश्वासन पूर्ण केले, आता राज्य सरकार आपले आश्वासन केव्हा पूर्ण करणार? असा सवाल तिने केला होता.'
यावर प्रतिक्रीया देताना हरियाणाचे क्रीडा मंत्री अनिल विज यांनी म्हटले आहे, तिच्या विनंतीवरून आम्ही महर्षी दयानंद विद्यापीठात नोकरीचा व्यवस्था केली होती. तसेच बाकीची औपचारिकता अजुन बाकी आहे.
पुढे ते म्हणाले, ती पदक जिंकून आल्यावर आम्ही तिला २.५ कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्यावर तिने महर्षी दयानंद विद्यापीठात नोकरीची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तेथे जागा रिकामी नसतानाही आम्ही तिच्या नोकरीची व्यवस्था केली. तरीही ती असे का म्हणत आहे हे मला कळत नाही.
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी साक्षी मलिक ५८ किलो वजनी गटातील पहिली भारतीय कुस्तीपटू महिला आहे.