सांकेतिक छायाचित्र
नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शेषनारायणने चमकदार कामगिरी दाखविली होती. १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या या पॉवर लिफ्टींग स्पर्धेत सब ज्युनिअर आणि ज्युनिर तसेच सिनियर गटामधील ५३ किलो वजनाच्या गटात त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे त्याची आगामी मार्च महिन्यातील २१ ते २५ तारखेला जम्मू-काश्मीर येथे होणार्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे. शेषनारायणने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले आहे.
या स्पर्धेतील यशाकरिता त्याला असोसिएशनचे अध्यक्ष विनायक जवळकर, वेट लिफ्टींगचे अध्यक्ष धनंजय वानखेडे, सचिव नारायण ठेंगडे, मास रेसलिंगचे सचिव रणजीत कथडे व प्रशिक्षक इब्राहीम खान यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. याआधी त्याने मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी केली होती.