ऑस्ट्रेलियाचा हा दौरा भारतासाठी खूप महत्वाचा असणार आहे, कारण विश्वचषकापुर्वी भारताची ही शेवटची एकदिवसीय मालिका असणार आहे. त्यामुळे इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक २०१९ च्या तयारीसाठी भारतीय संघाच्या दृष्टीने या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यानंतर इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) २३ मार्चपासून सुरवात होणार असून ३१ एप्रिलला ही स्पर्धा संपणार आहे. तर विश्वचषक २०१९ ही स्पर्धा ३० मे ते १४ जुलै यादरम्यान खेळण्यात येईल.
टी-२० मालिकेचे वेळापत्रक
- पहिला टी-२० सामना २४ फेब्रुवारी (संध्याकाळी ७ वाजता) बंगळूरु
- दुसरा टी-२० सामना २७ फेब्रुवारी (संध्याकाळी ७ वाजता) विशाखापट्टणम
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिला एकदिवसीय सामना २ मार्च (दुपारी १.३० वाजता) हैदराबाद
- दुसरा एकदिवसीय सामना –५ मार्च (दुपारी १.३० वाजता) नागपूर
- तिसरा एकदिवसीय सामना ८ मार्च ( दुपारी १.३० वाजता) रांची
- चौथा एकदिवसीय सामना –१० मार्च (दुपारी १.३० वाजता) मोहाली
- पाचवा एकदिवसीय सामना –१३ मार्च (दुपारी १.३० वाजता) दिल्ली