PIC COURTESY - TWITTER
स्मृती पुढे म्हणाली, की मला वाटते आम्ही चांगली टक्कर दिली. जर तुम्ही मालिका जवळून पाहिली, तर आम्ही ७०-८० टक्के सामना जिंकण्याच्या स्थितीत होतो. ही गोष्ट आमच्यासाठी चांगली असून संघात अजूनही सुधारणेला वाव आहे. आम्हाला फलंदाजीतील चुका टाळून लवकरात लवकर त्या दुरुस्त कराव्या लागतील. आम्हाला अशा फलंदाजांची आवश्यकता आहे जो २० षटके खेळण्याबरोबरच अंतिम षटकात फटकेबाजी करून धावा बनवू शकेल.
भारतीय संघ तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात जिंकण्याच्या स्थितीत होता. स्मृती मंधानाने या सामन्यात कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी करताना ५२ चेंडूत ८६ धावांची आक्रमक खेळी केली होती. परंतु, यानंतरही १६२ धावांचे आव्हान पार करताना भारताला ४ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावाच करता आल्या. या विजयासह न्यूझीलंडने भारताला मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला.