रिकी पाँटिंग
पाँटिंगला ऑस्ट्रेलियाच्या संघाबद्दल विचारले असता तो म्हणाला, की ऑस्ट्रेलिया विश्वकंरडक जिंकू शकतो. सध्याच्या फॉर्मचा विचार करता भारत आणि इंग्लंड विश्वकरंडक विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. पाँटिंगच्या मते, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या वापसीनंतर ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघालाही विश्वकरंडक जिंकण्याची संधी आहे. संघाचा साहाय्यक प्रशिक्षक या नात्याने मी बोलत नाही. इंग्लंडमधील वातावरण ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी अनुकुल आहे. त्यामुळे संघ चांगली कामगिरी करू शकतो.
ऑस्ट्रेलियाकडून खेळताना पाँटिंगने ३ विश्वकरंडक जिंकले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला मागील २६ एकदिवसीय सामन्यात केवळ ४ सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेआधी संघ व्यवस्थापनाने रिकी पाँटिंगला संघाच्या साहाय्यक प्रशिक्षक बनवले आहे.