मेलबर्न स्टार्स संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६८ धावा केल्या. प्रतिउत्तरात सिडनी सिक्सरचा डाव ७४ धावांवर आटोपला. बिग बॅश लीगमधील ही सर्वात कमी चौथी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१७ मध्ये सिडनी सिक्सरचा ९ बाद ९९ अशी धावसंख्या होती.
नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने ११ धावा देत ३ गडी बाद केले. मॅक्सवेलने सुरुवातील संथ खेळला. त्यानंतर त्याने २३ चेंडूत ६५ धावा केल्या. त्यात ३ षटकार जो बेनच्या एकाच षटकात मारले. मॅक्सवेलने मैदानाच्या प्रत्येक भागात फटकेबाजी केली. या खेळीमुळे त्याला सामानावीरचा किताब देण्यात आला.