कॉफी विथ करणच्या सहाव्या पर्वात अनेक सेलेब्रिटी येऊन गेले. शोची लोकप्रियतादेखील चांगली आहे. अलिकडेच या शोमध्ये क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल आले होते. या शोमध्ये त्यांनी मुलींबद्दल आक्षेपार्ह विधाने करुन वाद ओढवून घेतला. यामुळे त्यांनी बीसीसीआयची नाराजी सहन करावी लागली आहे.
दोघांनी केलेल्या मुलींबद्दलच्या घाणेरड्या कॉमेंटसची गंभीर दखल बीसीसीओयने घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतून त्यांना काढून टकण्यात आले आहे. इतकेच नाही तर अनेक कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी आणली आहे. बीसीसीआयने त्यांना क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅमध्ये खेळण्यावर बंदी घातली आहे.
झालेल्या वादानंतर कॉफी विथ करणचा हा एपिसोड आता इंटरनेटवरुन काढून टाकण्यात आला आहे.
कॉफी विथ करण हा शो पुढे सुरू ठेवायचा की, बंद करायचा यावर शोचे निर्माते विचार करीत असल्याचे एका आघाडीच्या वृत्तपत्राने म्हटले आहे.
कॉफी विथ करण हा सुरुवातीपासूनच अनेक वादांना जन्म घालणारा शो ठरला आहे. परंतु अलिकडे आलेल्या अनेक नकारात्मक बातम्यांमुळे यावेळी शो गंभीर अडचणीत आलाय.
हा शो बंद होणार का याबद्दलची खात्रीलायक बातमी नाही. तथापी, हा शो बंद करण्याचा विचार निर्माते करु लागलेत. शोच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक गोष्ट ठरु शकते.