भारतीय कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाने अप्रतिम झेल टीपत कोहलीला माघारी धाडले. कोहलीला केवळ ३ धावा करता आल्या. विराटनंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेही स्वस्तात माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क, हेजलवूड, कमिन्स आणि लायन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत भारताला रोखून धरले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अक्षरश: संघर्ष करताना दिसले. सामना सुरू झाल्याच्या पहिल्याच तासात भारताने ३ विकेट गमावले होते.ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल असूनही भारताला त्याचा फायदा उचलण्यात अपयश आले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी जाहीर केलेल्या १२ जणांच्या संघापैकी भारताने रोहित शर्माला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान देण्यात आले.