यंदा आयपीएल नियोजित वेळेपूर्वी दोन आठवडे आधीच सुरु होऊ शकते. दोन दिवसांपूर्वी विराटने भारतीय वेगवान गोलंदाजांना आयपीएलमध्ये न खेळण्याचा सल्ला दिला होता. फ्रेंचाईजीज आयपीएलमध्ये गोलंदाजांना विश्रांती देण्यास तयार होणार नसल्याचे आयपीएलचे सीईओ हेमंग अमीन यांनी विराटला सांगितले होते. यातील मधला मार्ग म्हणून आयपीएल २ आठवडे आधीच सुरु होऊ शकते.
यंदा आयपीएल एप्रिलमध्ये सुरु होणार होते. त्यात बदल होऊन २३ मार्चपासून सुरु होऊ शकते. भारतात २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याच्या तारखा निश्चित झाल्या नाहीत. निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्यावरच आयपीएलचा कार्यक्रम घोषित होऊ शकतो.