सोशल मीडिया अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म असलेल्या क्विंटले या कंपनीने वर्ष २०१६ च्या शेवटच्या सहा महिन्यांमध्ये १ लाख ६७ हजार प्रोफाईलचा अभ्यास केला असता ४७ टक्के लोक कोणत्याही स्त्रोतामार्फत आलेल्या किंवा फेसबुक लाईव्ह व्हिडिओचा वापर करत असल्याचे आढळून आले.
या प्रोफाईलपैकी ९० टक्के फेसबुकचे व्हिडिओ, ३० टक्के यूट्यूब व्हिडिओ व ९ टक्के विमिओ किंवा इतर व्हिडीओ स्त्रोतांचा वापर करत असल्याचे आढळून आले.
फेसबुक व यूट्यूबच्या सरासरी संवादाचे प्रमाण लक्षात घेता वर्ष २०१६ च्या शेवटच्या सहा महिन्यांमध्ये फेसबुक यूट्यूबपेक्षा ११० टक्क्यांनी समोर होते.