एका संशोधनातील निष्कर्षानुसार, कॅन्सर थांबवण्याची क्षमता असलेल्या पेशींवर शरीरातील अंतर्गत घड्याळाचा प्रभाव असतो. बर्लिनच्या चॅरिटी मेडीकल युनिव्हर्सिटीचे मुख्य लेखक एंजेला रिलोगियो यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, "आपले अंतर्गत घड्याळ बाहेरचा प्रकाश व अंधार यांच्या आधारे चालते. यामुळे लोकांची वर्तणूक व हालचाली प्रभावित होतात."
रिलोगियो यांनी सांगितले, "हे घड्याळ ट्यूमर शामकामप्रमाणे काम करते." हे संशोधन 'पीएलओएस बायोलॉजी' पत्रिकेत प्रकाशित झाले असून या अभ्यासासाठी टीमने आरएएस नामक प्रोटिनचे विश्लेषण केले आहे. हे प्रोटिन उंदरांमधील एक चतुर्थांश पेशींमध्ये सक्रीयपणे काम करते. शरीरातील पेशींचे वेगाने वाढणे नियंत्रित करणारे आरएएस लोकांच्या अंतर्गत घड्याळाला प्रभावित करते.
जेटलॅगमुळे शरीरातील अंतर्गत घड्याळाचे तंत्र बिघडते. त्यामुळे सतत लांबचा विमान प्रवास करणे तुमच्या शरीरात कॅन्सरचा धोका निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.