१. मेष राशी
मेष राशीच्या महिलांनी करवा चौथच्या दिवशी लाल आणि गोल्डन रंगाचे कपडे परिधान करुन पूजा केल्यास ते त्यांच्यासाठी लाभदायक असते.
२. वृषभ राशी
वृषभ राशीच्या महिलांनी या करवा चौथला सिल्वर आणि लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. या रंगाचे कपडे परिधान करुन पूजा केल्याने त्यांच्या पतीच्या प्रेमात कधीही कमी निर्माण होत नाही.
३. मिथुन राशी
या राशीच्या महिलांनी हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून चंद्राला पाहावे. असे केल्याने त्यांचे पती दीर्घायुषी होतात.
४. कर्क राशी
कर्क राशीच्या महिलांनी लाल किंवा पांढऱ्या रंगाची साडी घालून त्यावर रंगिबेरंगी बांगड्या घालून पूजा करावे. याशिवाय प्रसादातसुद्धा पांढऱ्या रंगाची बर्फीचा वापर केल्याने त्यांच्या पतीकडून दुप्पट प्रेम मिळेल.
५. सिंह राशी
या राशीच्या महिलांजवळ अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या महिला लाल, नारंगी, गुलाबी आणि गोल्डन रंगाचे कपडे परिधान करून पूजा करावे. यामुळे देव त्यांच्यावर त्वरित प्रसन्न होऊन पती-पत्नीत नेहमी प्रेम टिकवून ठेवतात.
६. कन्या राशी
कन्या राशीच्या महिलांनी लाल, हिरवा किंवी गोल्डन रंगाच्या साडी घातल्याने त्यांच्या दांम्पत्य जीवनात प्रेम अधिक वाढते.
७. तुळ राशी
या राशीच्या महिलांनी यावर्षी पूजा करतेवेळी लाल, सिल्वर, गोल्डन रंगाचे कपडे परिधान करावे. या रंगाचे कपडे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असतात. असे केल्याने पतीचे प्रेम नेहमी तुमच्यासोबत असते.
८. वृश्चिक राशी
या राशीच्या महिलांनी लाल, मरूम किंवा गोल्डन रंगाची साडी घालून पूजा केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम अधिक वाढते.
९. धनु राशी
धनु राशीच्या महिलांनी पिवळा किंवी आकाशी रंगाचे कपडे परिधान करुन त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्याने देव त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतील.
१०. मकर राशी
मकर राशीच्या महिलांसाठी निळा हा शुभ रंग आहे. या रंगाचे कपडे परिधान करून चंद्राची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
११. कुंभ राशी
या महिलांनी नेवी ब्ल्यू किंवा सिल्वर रंगाचे कपडे परिधान करून पूजा करावे. यामुळे त्यांच्या जीवनात सुख-शांती सदैव टिकून राहते. तसेच पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते.
१२. मीन राशी
मीन राशीच्या महिलांसाठी लाल रंग किंवा गोल्डन किंवा दोन्ही रंग मिक्स असणारे कपडे परिधान शुभ असेल. या रंगाचे कपडे परिधान केल्याने त्या अखंड सोभाग्यवती बनतात.