रोहित वेमुला हैदराबाद विद्यापीठामध्ये पीएचडीचा विद्यार्थी होता. भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर चार विद्यार्थ्यांसह त्याला विद्यापीठातून काढण्यात आले होते.
अभाविपने एएसएविरोधात केलेली तक्रार केंद्रीयमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे पाठवण्यात आली होती. दत्तात्रेय यांनी ही तक्रार एचआरडी मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे पाठविली होती. विद्यापीठातील हॉस्टेलमधून रोहितला त्याच्या ४ मित्रांसह काढून टाकण्यात आले होते. यानंतर रोहित आणि त्याच्या मित्रांनी विद्यापीठ कॅम्पसमध्येच बेमुदत उपोषण सुरू केले होते. यानंतर विद्यापीठाच्या छळाला कंटाळून १७ जानेवारी २०१६ रोजी रोहितने आत्महत्या केली.