वाचा -
परराष्ट्रमंत्रालयाच्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी २०१८ मध्ये भारत-अमेरिकेदरम्यानच्या संबंधांवरही समाधान व्यक्त केले आहे. याचबरोबर त्यांनी नव्या '२ प्लस २ चर्चे'च्या व्यवस्थेची सुरुवात आणि भारत, अमेरिका व जपान यांच्यातील पहिल्या त्रिपक्षीय शिखर संमेलनाचेही कौतुक केले.
मोदी, ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात ब्यूनस आयर्स येथे जी-२० शिखर संमेलनादरम्यान चर्चा झाली होती.
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा एक गट आहे. या गटाचे २०१७ मध्ये पुनरुज्जीवन करण्यात आले होते. भारत-प्रशांत भागात शांतता आणि समृद्धीसाठी काम करणे, हा या समुहाचा उद्धेश आहे.
याशिवाय, मोदी आणि ट्रम्प यांनी संरक्षण, ऊर्जा, दहशतवादाच्या विरोधात आणि क्षेत्रीय व जागतीक मुद्यांवरही समन्वय आणि द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर जोर देण्यात आला, असेही मंत्रालयच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.