प्रतिकात्मक छायाचित्र
उत्तरप्रदेशात बँकांनी शेतकऱ्यांना २७ हजार ४२० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. भाजप सरकारने आपले आश्वासन पूर्ण केल्यास त्याचा तोटा या कर्ज देण्याऱ्या बँकांना सहन करावा लागणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने २०१२ ला दिलेल्या अहवालानुसार उत्तरप्रदेशातील अडीच एकरपेक्षा कमी ३१ टक्के जमीनधारक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. कर्जमाफी जर उत्तरप्रदेशात लागू केली, तर या सरकारला २७ हजार ४१९.७० कोटी रुपये माफ करावे लागतील.
उत्तरप्रदेशातील ४० टक्के नागरिक शेती करुन आपली गुजराण करतात. त्यातील ९२ टक्के नागरिक कमाल धारणेखाली येतात. त्यामुळे राज्याचा ८ टक्के हिस्सा सरकारला कर्जमाफीवर सोडावा लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारच्या कर्जमाफी घोषणेची आम्ही वाट पाहत असल्याचे सांगितले.