"अभिव्यक्ती स्वांत्र्यासाठीच्या संघर्षाला सीमेचे बंधन असत नाही. मंटोला स्वातंत्र्य मिळावे यासाठी पाकिस्तानात प्रयत्नशील असणाऱ्यांचे आभार. मंटोवरील बंदी उठवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाकिस्तानातील प्रत्येकाचे मी आभार मानते. मी आणि मंटोची पूर्ण टीम तुमच्यासोबत आहे,"असे नंदिता दास यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
"आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना पाहून थक्क व्हायला होते. फैज अहमद फैज यांची मुलगी आणि प्रसिध्द लेखिका, कलाकार सलिमा हाश्मी आमि इतरांचे आभार. आदर आणि आभार,'' असेही दास यांनी लिहिलंय.
मंटो चित्रपटाचे सल्लागार आणि पाकिस्तानातील नाटककार, पत्रकार सईद अहमद यांनी इम्रान खान सरकारकडे चित्रपट दाखवण्याची ऑनलाईन मागणी केली होती. मंटो मेमोरियल सोसायटी यांच्या मदतीने लाहोर, कराची, पेशावर आणि मुल्तान या शहरात शांततेत आंदोलन पार पडले.
पाकिस्तानातील सेन्सॉर बोर्डाने मंटो चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंटोचे चरित्र पाकिस्तानी नागरिकांना पाहाता येत नाही. याबद्दल सुरू असलेल्या या संघर्षाला यश यावे हीच मंटो प्रेमी पाकिस्तानी नागरिकांची मागणी आहे.