17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या उदघाटन कार्यक्रमात प्रभावळकर यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षात हा पुरस्कार मिळणे हा मोठा बहुमान असल्याचे प्रभावळकर यांनी सांगितले. गुरुवारी पुण्यातल्या कोथरूड सिटी प्राईड इथे 17 व्या पिफ महोत्सवाचे उदघाटन झाले. हा महोत्सव पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनाही ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. तर अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते संगीतकार रामलक्ष्मण यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्यूझिक अँड साऊंड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इअर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून त्या अंतर्गत महोत्सवात महात्मा गांधी यांना चलचित्र आदरांजली वाहण्यात येणार आहे.
महोत्सवाचे सूत्रसंचालन अभिनेते सुमित राघवन व क्षितिज दाते यांनी केले. तर उद्घाटन सोहळ्याची सुरूवात ग्लॅडिस फर्नांडेझ व संतोष अवतरामानी यांच्या टँगो नृत्याने झाली, तसेच कार्यक्रमानंतर ‘डॅम किड्स’ हा गोन्जालो जस्टिनिअॅनो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविला गेला. गुरुवारपासून पुढील ७ दिवस चालणाऱया या महोत्सवात ५६ देशांमधून आलेले १५० हून अधिक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.