'फोटोग्राफ' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. त्याचा 'ठाकरे' हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापाठोपाठ त्याचा 'फोटोग्राफ' हा चित्रपट ८ मार्च रोजी रिलीज होईल. यात नवाजसोबत सान्या मल्होत्राची मुख्य भूमिका आहे.
'फोटोग्राफ' चित्रपट बर्लिनच्या वारीवर निघालाय. तरण आदर्श यांनी ही माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. यामध्ये नवाजुद्दीन 'फोटोग्राफ' चित्रपटाचा क्लॅप दाखवताना दिसतोय. बर्लिन महोत्सवात या चित्रपटाचे स्वागत कसे होतंय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.