दरवर्षी हजारो गावांना दुष्काळाचा तडाखा बसतो. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी राज्य सरकार व पाणी फाऊंडेशनने एकत्र येत ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश गावातील पाणी टंचाईशी लढा देण्याचा आहे. पाण्याचे संरक्षण व संवर्धन, जलसाठ्यात वाढ करणे, जल साक्षरता चळवळ राबविणे, पाण्याचा योग्य वापर यासह विविध मार्गांचा अवलंब करत पाणी वाचविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.