• मुंबई - खार स्टेशनवर जलद लोकलच्या पेंटाग्राफला आग, जीवितहानी नाही
  • सातारा- महाबळेश्वरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू
  • पुणे : माओवाद्यांशी संबंधित ५ जणांवर ५१६० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल
मुख्‍य पानMoreगुन्‍हेवृत्तMoreस्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Redstrib
स्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Blackline
ठाणे - ६ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये स्नेहालयातून पळालेल्या २ महिलांचा समावेश आहे.
Published 13-Oct-2018 18:05 IST
नागपूर - बंदुकीचा धाक दाखवून लोकांना लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांना नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींजवळून १ बंदूक (माऊजर) मॅगझिन आणि १ जिवंत काडतूस जप्त केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सनीMore
Published 13-Oct-2018 13:43 IST
पुणे - देहूगाव येथे तिघांनी एकाचा धारदार हत्याराने वार करून खून केला. हा प्रकार शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र या तरुणाचा खून का करण्यात आला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Published 13-Oct-2018 13:11 IST
मुंबई - बँकेच्या खात्यातील पैसे लुटणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे. खातेधारकांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डचा डेटा चोरून हे चोरटे चोरी करायचे. आतापर्यंत या टोळीने कोट्यवधी रुपये चोरले असल्याचे समजते.
Published 13-Oct-2018 02:05 IST
ठाणे - अल्पवयीन मुलांसह तरुण-तरुणींना मादक द्रव्याच्या विक्रीच्या गोरखधंद्याचा अंबरनाथ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नशेचा व्यापार करणाऱ्या या गोरखधंद्यातील दोन सराईत महिला तस्करांना सापळा रचून गजाआड केले आहे. सईदा शेख (५२), रूक्साना शेख (४०) असे याMore
Published 12-Oct-2018 22:41 IST
रायगड - मुंबई-मंगलोर एक्स्प्रेस दरम्यान ५ सप्टेंबर रोजी सोने व रोख रक्कम असा १ कोटी ९० लाखाचा ऐवज घेऊन जाणाऱ्या सौरभ जैन यास लुटले होते. या लुटमारीत समावेश असलेल्या ३ आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून १More
Published 12-Oct-2018 21:43 IST
यवतमाळ - जिल्ह्यातील आर्णीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी गुंगीच्या गोळ्या देऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ गुरुवारी नागरिकांकडून आर्णीत कडकडीत बंद ठेवण्यात आलाMore
Published 12-Oct-2018 10:52 IST
पुणे - दौंड तालुक्यातील चौफुला गावाच्या हद्दीत मंगळवारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता तिच्या पतीनेच खून केल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
Published 12-Oct-2018 03:43 IST
नागपूर - जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्या २ मुलांचा खून करुन विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. ही घटना नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या राजीव नगर परिसरात घडली आहे.
Published 11-Oct-2018 22:58 IST
गोंदिया - रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन अल्पवयीन मुलांना गांज्याची तस्करी करताना रंगेहात पकडले. हे दोघे कुर्ला एक्सप्रेसमधून गांज्याची तस्करी करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ३२ किलो गांजा जप्त केला आहे.
Published 11-Oct-2018 12:18 IST
बीड - सावकाराच्या व्याजाचे पैसे वेळेत परत न केल्याने संबंधित सावकारांनी शेतकऱ्याला बळजबरीने विष पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये मंगळवारी सकाळी संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
Published 10-Oct-2018 14:17 IST | Updated 14:26 IST
गोंदिया - बापट लॉन परिसरातील एका घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. घरफोडीतील माल जप्त करण्यात आला असून या टोळीने शहरात इतर ठिकाणीही चोऱ्या केल्याचे समोर आले आहे.
Published 10-Oct-2018 03:51 IST
नागपूर - गोवा कॉलनीजवळील रेल्वेरुळालगत एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Published 10-Oct-2018 02:32 IST | Updated 09:24 IST
जालना - अंबड तालुक्यातील पंगरखेडा घराचा कडीकोयंडा तोडून १ लाख ५३ हजार ९०० रूपयांची घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री ९ ते आज सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 09-Oct-2018 22:55 IST