पोलिस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक आणि पोलिस स्टेशन भंडाराचे एक अशी दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या वेळी शिवाजी चौक वॉर्ड येथे धाड टाकली.
यावेळी जुगार खेळताना विशाल पंजाबराव रहाटे (३६) रा. शिवाजी वॉर्ड, निखील भैय्याजी वाल्मिक (२९) रा. विद्यानगर भंडारा, शुभम श्रीधर वाहाने (२२) रा. राणी लक्ष्मीबाई वॉर्ड भंडारा, निलेश अशोक शेंडे (२८) रा. खात रोड भंडारा, संदीप भाऊराव महाजन (३५) रा. लाल बहादूर शास्त्री वॉर्ड भंडारा, संदीप दिलीप कुंभलकर (२३) रा. सुभाष वॉर्ड, नरेंद्र मारोती बारापात्रे (३0) रा. लहरी आर्शम वॉर्ड भंडारा, शंकर अशोक शेंडे (३५) रा. संताजी वार्ड भंडारा, कुणाल प्रमोद (२१) रा. शुक्रवारी भंडारा, इलियाज उस्मान खान (३८) रा. अंसारी वॉर्ड भंडारा, सतिश मोरेश्वर तुमसरे (३५) रा. फ्रेंडस् कॉलनी भंडारा या अकरा जणांना अटक करण्यात आली.