१८७७ साली क्रिकेटचा हा पहिला कसोटी सामना, त्याकाळी सर्वांना परिचीत असलेल्या इंग्लंड संघामध्ये व त्यावेळी नवीनच असलेल्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये खेळला गेला होता. मेलबर्न स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात ४५ धावांनी ऑस्ट्रेलिया संघ विजयी झाला होता.
या सामन्यात इंग्लंड संघाच्या अल्फ्रेड शॉने सर्वप्रथम गोलंदाजी केली होती. तर ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरममने त्याला उत्तर देत उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्यानंतर मेलबर्न स्टेडिअमवर झालेले सलग दोन कसोटी सामने मात्र इंग्लडने जिंकले.
'आजच्या गुगल- डुडलमध्ये गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक तसेच संघातील इतर खेळाडू लाल चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात असल्याचे', आपल्याला दिसतील.